CONTENTS अर्जुनाला
सैन्याची पाहणी करायची आहे अर्जुनाने
युद्धाच्या दुष्परिणामांचे वर्णन करत आहे जेव्हा
मार्ग कठीण होतो, अगदी कणखर लोकही चुकीच्या मार्गाने जावू
शकतात आत्मा
चिरंतन आहे, शरीर क्षणभंगुर आहे भगवान
श्रीकृष्ण अर्जुनला योद्धा म्हणून असलेल्या त्याच्या कर्तव्याची आठवण करुन देतात कर्मयोगाचे
महत्व, नि: स्वार्थ सेवा वेद
जीवनातील भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाबींचा अभ्यास करतात इंद्रिय
नियंत्रण आणि आत्म-ज्ञानाद्वारे
शांती आणि आनंदाची प्राप्ती एखाद्याने
इतरांची सेवा का करावी? एकमेकांना
मदत करणे ही निर्मात्याची पहिली आज्ञा आहे सर्व
कर्मे ही निसर्गाची कर्मे आहेत आत्मसाक्षात्काराच्या
मार्गातील दोन मोठे अडथळे 4. ज्ञानासह सर्वसंग परित्यागाचा मार्ग संलग्न, अलिप्त
आणि निषिद्ध कर्म कर्मयोगी
कर्माच्या नियमांच्या अधीन नाही वेगवेगळ्या
प्रकारच्या अध्यात्मिक पद्धती अलौकिक
ज्ञान मिळवणे ही एक श्रेष्ठ आध्यात्मिक पद्धत आहे कर्मयोगींवर
अलौकिक ज्ञान स्वयंचलितपणे प्रकट होते निर्वाणासाठी
अलौकिक ज्ञान आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत दोन्ही
पथ परमात्म्याकडे पोहोचतात एक
कर्मयोगी भगवंतासाठी कार्य करतो प्रबुद्ध
व्यक्तीची अतिरिक्त लक्षणे तिसरा
मार्ग ---
भक्तीपूर्ण ध्यान
आणि चिंतनाचा मार्ग मन एक
मित्र आणि शत्रू दोन्हीही आहे मनाला
नियंत्रित करण्याच्या दोन पद्धती 7. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान पदार्थ, चैतन्य
आणि आत्मा यांची परिभाषा परमात्मा
हा प्रत्येक गोष्टीचे मूळ असतो देव
कोणत्याही प्रकारच्या उपासनेम्ध्ये प्रतिमेच्या स्वरूपात दिसू शकतो परमात्मा, आत्मा, स्वतंत्र
आत्मा आणि कर्म यांची व्याख्या पुनर्जन्म
आणि कर्माचा सिद्धांत ईश्वर-प्राप्तीची एक सोपी पद्धत मृत्यूच्या
वेळी देवाचे ध्यान करून मोक्ष मिळव निर्मितीतील
प्रत्येक गोष्ट चक्रीय आहे परात्पर
स्वरूपाचे ज्ञान हे परम रहस्य आहे उत्क्रांती
आणि चक्रव्यूहाचा सिद्धांत ज्ञानी
आणि अज्ञानी लोकांचे मार्ग सर्व
काही परमात्म्याची अभिव्यक्ती आहे भक्ती
प्रेमाद्वारे मोक्षप्राप्ति परमेश्वर
प्रेम आणि भक्तीने अर्पण केलेले स्वीकारतो आणि ग्रहण करतो भक्तीमय प्रेमाचा
मार्ग सोपा आहे देव आपल्या
भक्तांना ज्ञान देतो वास्तवाचे
वास्तविक स्वरुप कोणालाही माहिती नसते सर्व
काही परिपूर्णतेची अभिव्यक्ती आहे दैवी
अभिव्यक्तींचे थोडक्यात वर्णन अभिव्यक्त
स्वरूप हा परिपूर्णतेचा अगदी लहान भाग आहे ईश्वराची
दृष्टी हे साधकाचे अंतिम लक्ष्य आहे भगवान
श्रीकृष्ण आपले वैश्विक रूप दाखवतात देव
पाहण्यास व्यक्ती तयार किंवा पात्र नाही विश्व
रूप पाहून अर्जुनाला भय वाटत आहे व्यक्ती
कोणत्याही स्वरूपात देव पाहू शकते देव
भक्तीयुक्त प्रेमाने पाहिला जाऊ शकतो एखाद्याने
वैयक्तिक की असामान्य देवाची उपासना करावी? भगवंताच्या
वैयक्तिक स्वरूपाची उपासना करण्याची कारणे एखाद्याने
ईश्वरी गुण विकसित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे निर्वाणाचे
साधन म्हणून चौपदरी उदात्त सत्य ईश्वराचे
वर्णन बोधकथेद्वारे केले जाऊ शकते आणि इतर कोणत्याही प्रकारे नाही परमात्मा, आत्मा, भौतिक
प्रकृती आणि स्वतंत्र आत्म्याचे वर्णन केवळ
श्रद्धेने निर्वाण होऊ शकते सर्व
प्राणी आत्मा आणि पदार्थांच्या संगतीतून जन्माला येतात भौतिक
प्रकृतीचे तीन गुण आत्म्याचे शरीराशी बंधन कसे करतात प्रकृतीच्या
तीन गुणांची वैशिष्ट्ये आत्म्याच्या
स्थानांतरणाची वाहने देखील त्रिगुण आहेत भौतिक
प्रकृतीचे तीन गुण ओलांडल्यानंतर निर्वाण मिळवा तीन
गुणांच्या वर येण्याची प्रक्रिया भक्तीयुक्त
प्रेमाने तीन गुणांचे बंध कापले जाऊ शकतात सृष्टी
ही मायेच्या सामर्थ्याने तयार केलेल्या वृक्षासारखे आहे आसक्तीचा
वृक्ष कसा कापून मोक्ष प्राप्त करावा आत्मा हा
प्रत्येक गोष्टीचे सार आहे सर्वोच्च
आत्मा, आत्मा आणि निर्मित प्राणी काय आहेत? तारणाकरिता
जोपासल्या जाणाऱ्या प्रमुख दैवी गुणांची यादी जे
सोडायला हवे अशा आसुरी गुणांची यादी केवळ दोन
प्रकारचे मनुष्य आहेत: शज्ञानी
आणि अज्ञानी काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन
द्वारे आहेत विचार, शब्द आणि कृती यांची तपस्या 18. अहंकाराचा त्याग करून मुक्ती मिळवणे संन्यास
आणि त्याग यांची परिभाषा तीन
प्रकारचे संकल्प आणि मानवी जीवनाची चार उद्दीष्टे श्रम
विभागणी व्यक्तीच्या क्षमतेवर आधारित आहे कर्तव्य, शिस्त
आणि भक्तीद्वारे मोक्ष मिळविण्याचा प्रयत्न शरण जाणे
हाच परमात्म्याकडे जाण्याचा अंतिम मार्ग आहे परमेश्वराची
सेवा आणि सर्वोत्तम दान ज्ञान
आणि कर्म दोन्ही आवश्यक आहेत भगवद-गीता श्लोकार्थ (मराठीमध्ये
भगवत गीतेतील श्लोक) (IGS द्वारे
इंग्रजी अनुवाद) 1. अर्जुनाची द्विधा
मनस्थिती महाराज धृतराष्ट्र म्हणाला: हे संजय, कुरुक्षेत्राच्या पवित्र क्षेत्रात जमलेले आणि
लढाईसाठी उत्सुक असलेल्या, माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले आहे? (1.01) संजय म्हणाला: पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना पाहून, राजा दुर्योधन आपल्या आचार्यांकडे जावून म्हणाला: (1.02) हे गुरुदेव, पंडूच्या मुलांच्या या शक्तिशाली सैन्याकडे पाहा, ज्याची व्ह्यूहरचना आपल्याच अत्यंत बुद्धिमान शिष्य – (धृष्टद्युम्न) याने केली आहे. त्यांच्याकडे अनेक महान योद्धे, शूरवीर, नायक आणि शक्तिशाली धनुर्धर आहेत. मी आपल्याला
त्यांच्यापैकी काहींची नावे सांगतो. (1.03-06) हे देखील लक्षात घ्या की, अनेक उत्तम वीर आपल्या बाजूला आहेत. (दुर्योधन पुढे म्हणतो) मी माझ्या सैन्याचे सेनापती आणि इतर अनेक वीरांची नावे घेईन, जे माझ्यासाठी स्वत:च्या जीवावर
उदार झालेले आहेत. ते वेगवेगळ्या
शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि सर्वजन युद्ध कलेमध्ये निपुण आहेत. (1.07-09) आपले सैन्य अजिंक्य आहे, त्यामुळे त्यांच्या सेनेवर विजय मिळवणे सोपे आहे. म्हणूनच, तुम्ही सर्वजण नेमून दिलेल्या ठिकाणी उभे राहून, आपले सेनापती
भीष्म यांचे संरक्षण करा. (1.10-11) कुरु घराण्यातील सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या भीष्मांनी
सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख फुंकताच दुर्योधनाला आनंद झाला. (1.12)
त्यापाठोपाठ, शंख, नगारे, झांजा, ढोल आणि रणशिंग एकत्र वाजविले जात होते. त्यांचा
ध्वनी अति प्रचंड होता. (1.13) त्यानंतर शुभ्र अश्वांनी सुसज्ज, भव्य रथामध्ये आरूढ असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन
यांनी आपापले दिव्य शंख फुंकले. (1.14)
कृष्णाने आपला शंख फुंकला; त्यानंतर अर्जुन आणि सैन्याच्या इतर सर्व
विभागातील सेनापतींनी आपापले शंख फुंकले. पृथ्वी आणि अवकाशात झालेल्या त्या अति
प्रचंड गर्जनेने कौरवांची मने विदीर्ण झाली. (1.15-19) अर्जुनाला सैन्याची पाहणी करायची आहे कौरवांना उभे असलेले पाहून आणि शस्रास्रांचा वार करून आता युद्ध सुरूच होणार असे असतांना, ज्याच्या रथाच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे, अशा अर्जुनाने
धनुष्य उचलले आणि तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला: हे परमेश्वरा, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेवून
उभा कर, जेणेकरून येथे युद्ध करण्याच्या
इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्रास्रस्पर्धेमध्ये
संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मला पाहू देत. (1.20-22) जे लोक लढाईसाठी एकत्र होवून वाईट विचारांच्या
कौरवांची साथ देत आहेत, त्यांना खुश करत आहेत अशांना पहावे ही माझी इच्छा आहे. (1.23)
संजय म्हणाला: हे राजन, भगवान श्रीकृष्णांनी, अर्जुनाने विनंती केल्याप्रमाणे भिष्म, द्रोण आणि इतर सर्व राजांच्या दोन्ही सैन्याच्या मधोमध तो सर्वोत्तम रथ उभा केला आहे आणि अर्जुनाला सांगितले: युद्धासाठी जमलेल्या या सर्वकौरवांना पाहा! (1.24-25) तेथे अर्जुनाला आपले काका, आजोबा-पणजोबा, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातवंडे आणि स्वजन दिसतात. (1.26) सासरे, सोबती आणि आपले सर्व आप्तजन दोन्ही सैन्याच्या परस्पर विरुद्ध गटात उभे असलेले पाहून अर्जुनाला खूप वाईट वाटले आणि दुःखाने तो
म्हणाला: हे कृष्णा, युद्धासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या माझ्या आप्तजणांना पाहून माझे गात्र गळून गेले आहे आणि माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. माझे शरीर थरथरले आहे
आणि माझ्या शरीराला कंप सुटला आहे. (1.27-29)
माझ्या हातातून धनुष्य गळून पडत आहे आणि माझ्या अंगाची
लाही लाही होत आहे. माझे मस्तक
झुकले आहे, मी स्थिर उभे राहण्यास असमर्थ आहे, आणि हे कृष्णा, मला अशुभ संकेत मिळत आहेत. युद्धामध्ये माझ्याच
नातलगांना ठार मारण्यामध्ये मला काहीही स्वारस्य वाटत
नाही. (1.30-31) हे कृष्णा, मला ना विजयाची, ना आनंदाची ना राज्याची इच्छा आहे. हे कृष्णा, हे असे राज्य, आनंद किंवा जीवनाचा काय उपयोग आहे? कारण ज्यांच्यासाठी आपण राज्य, आनंद आणि सुख मिळवू इच्छितो ते सर्व --- आपले
जीवन आणि संपत्ती सोडून लढाईसाठी इथे उभे आहेत. (1.32--33)
तीनही लोकांच्या सार्वभौमत्वासाठीसुद्धा, माझे गुरुजन, काका, मुले, आजोबा, मामा, सासरे, नातू, मेहुणे आणि इतर आप्तजणांना मारण्याची माझी इच्छा नाही तर एका पृथ्वीवरील राज्यासाठी मी हे कसे करू. (1.34-35) हे भगवान
श्रीकृष्ण, धृतराष्ट्राच्या या पुत्रांची हत्या करण्यात आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे? या अपराध्यांची हत्या केल्यानंतर देखील आमच्या पदरी केवळ
पापाचाच संचय होईल. (1.36) म्हणूनच, आम्ही आमच्या चुलतभावांना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना ठार मारू नये. हे
कृष्णा, आपल्याच आप्तजणांना ठार मारल्यानंतर आम्ही सुखी कसे होऊ
शकतो? (1.37) जरी ते लोभामुळे
आंधळे झाले असले तरीही, कुटूंबियांच्याच नाशामुळे होणारे पाप किंवा मित्रांचा
विश्वासघात केल्याने होणारे दोष त्यांना दिसत
नाही, परंतु कुटुंबाचा
विनाश करताना स्पष्टपणे आम्हाला पाप दिसत असेल तर हे कृष्णा, आम्ही परत मागे फिरण्याचा विचार का करू नये? (1.38-39) अर्जुनाने युद्धाच्या दुष्परिणामांचे वर्णन करत आहे एखाद्या कुळाच्या नाशामुळे परंपरागत कुळाचार आणि
कूळधर्म नष्ट होतात.
कौटुंबिक परंपरा नष्ट झाल्यामुळे उर्वरित कुटुंबात
अनैतिकता तयार होते. (1.40) आणि जेव्हा अनैतिकता व्यापून टाकते तेव्हा हे कृष्णा, त्या कुटुंबातील स्रिया दूषित होतात; जेव्हा कुटुंबातील स्रिया दूषित होतात, तेव्हा अनेक सामाजिक समस्या उत्पन्न होतात. (1.41)
याने कुळ आणि कुळ परंपरा नष्ट करणारे नरकात जातात, कारण पिंड आणि
जलअर्पणापासून वंचित झाल्यामुळे त्यांच्या पूर्वजांचे / पितर आत्मे अधोगतीला जाताल (1.42) जे आपलीच कुळे नष्ट करतात त्यांची शाश्वत सामाजिक सुव्यवस्था आणि त्यांचे कौटुंबिक
परंपरेतील सार्वकालिक गुण त्यांच्याच अनैतिकतेच्या पापी कृतीने नष्ट होतात. (1.43) हे कृष्णा, आम्हाला असेही सांगण्यात आले आहे की कुलपरंपरेचा विध्वंस करणारे लोक दीर्घ काळ नरकातच खितपत पडतात. (1.44) जेव्हा मार्ग कठीण होतो, अगदी कणखर लोकही चुकीच्या मार्गाने जावू शकतात अरेरे! राज्यसुख भोगण्याच्या लोभामुळे आम्ही आमच्याच आप्तजनांना ठार
मारण्याच्या प्रयत्नातून मोठे पाप करण्यास तयार झालो आहोत. (1.45)
शस्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या नि:शस्र आणि
प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. (1.46)
संजय म्हणाला: रणांगणावर शोकाकुल झालेला अर्जुन धनुष्य-बाण टाकून देवून रथाच्या आसनावर जावून बसला आहे. (1.47) 2. अलौकिक ज्ञान संजय म्हणाला: अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या आणि निराश झालेल्या अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. (2.01) परम भगवान म्हणाले: या क्षणी तू असा उदास कसा झालास? मनाने आणि कर्माने शुद्ध असलेल्या व्यक्तीस हे
शोभनीय नाही. हे निंदनीय आहे आणि हे अर्जुना, अशाने तू स्वर्गात जावू शकणार नाहीस. (2.02) हे अर्जुन, भ्याड होऊ नकोस, कारण तसे करणे तुला शोभत नाही. आपल्या अंत:करणाचे असे तुच्छ
दुबळेपण दूर कर आणि हे
अर्जुना, युद्धासाठी सज्ज
हो. (2.03) अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, मला पूजनीय असलेल्या भीष्म आणि द्रोण यांच्यावर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन?
(2.04) या महान गुरूंना
मारण्यापेक्षा या जगात भिक्षा मागून राहणे अधिक श्रेयस्कर होईल, कारण त्यांना ठार मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या संपत्तीचा आणि
सुखांचा आनंद मी कसा घेवू शकेल. (2.05) कोणता पर्याय निवडायचा, युद्ध करायचे की नाही करायचे? आमच्यासाठी अधिक चांगले काय आहे. याहीपुढे, आम्हाला हे ही ठावूक नाही की आम्ही जिंकू की ते आमच्यावर विजय मिळवतील. आमच्यासमोर उभे असणार्या धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारल्यानंतर, खरे तर आम्ही जगण्याची इच्छासुद्धा करू नये. (2.06) करुणेच्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्यांबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझे मन कर्तव्याप्रति गोंधळून गेले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, निर्णायकपणे, माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते मला सांगावे कारण मी तुमचा शिष्य आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा. (2.07) मला याचे आकलन होत नाही की या
पृथ्वीवरील एक अतुलनीय आणि समृद्ध राज्य मिळवून किंवा स्वर्गातील देवांवर अधिराज्य
गाजवून सुद्धा माझ्या इंद्रियांना शुष्क / कोरडे करणारे हे दु: ख नाहीसे कसे होईल. (2.08) संजय म्हणाला: हे राजा, भगवान श्रीकृष्णाला हे सांगून झाल्यानंतर पराक्रमी अर्जुनाने कृष्णाला म्हटले: मी युद्ध करणार नाही आणि तो स्तब्ध झाला. (2.09) हे राजा, भगवान श्रीकृष्ण, जणू काही स्मित करत, दोन सैन्याच्यामध्ये उभे राहून, दु: खी झालेल्या अर्जुनाला म्हणाले. (2.10) सर्वशक्तिमान
परमेश्वर म्हणाले: जे शोक करण्यायोग्य नाहीत त्याबद्दल तू शोक
करीत आहेस;
आणि तरी
पंडितांप्रमाणे
युक्तिवाद करत आहेस. ज्ञानीजन जिवीत किंवा मृतांबद्दल कधीही
शोक करीत नाहीत. (2.11) असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा हे सम्राट, तू किंवा मी अस्तित्त्वात नव्हतो किंवा भविष्यकाळातही आपले अस्तित्व कधीही
संपुष्टात येणार नाही/आपण कधीही
अस्तित्त्वविहीन होणार नाही. (2.12) ज्याप्रमाणे कोणताही सजीव (आत्म्या, जीव, जीवात्मा) या
आयुष्यामध्ये बालपण,
तरूण
शरीर आणि वृद्धापकाळात वेगवेगळे शरीर प्राप्त करतो; त्याचप्रकारे, मृत्यूपश्चात जीवात्मा दुसरे
शरीर प्राप्त करतो. ज्ञानी जनांना हे सर्व माहित
आहे. (15.08 देखील पाहा) (2.13) इंद्रियांचा विविध वस्तूंशी संपर्क आला की
उष्णता आणि थंडी, सुख-दु:ख या भावना जन्म घेतात. त्या क्षणिक आणि तात्कालिक असतात. म्हणून हे अर्जुना,
(2.14) त्यांना सहन
करणे शिकून घे, कारण एक धीर मनुष्य / शांत व्यक्ती --- जो या इंद्रिय वस्तूंनी
ग्रासलेला नाही, आणि सुख-दु:ख अशा
दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर आहे - हे
अर्जुना, त्यालाच मोक्ष
प्राप्ती होवू शकते. (2.15) आत्मा चिरंतन आहे, शरीर क्षणभंगुर आहे अदृश्य आत्मा (सत्, आत्म्या) चिरंतन आहे आणि दृश्यमान जग (भौतिक शरीरासह)
क्षणिक आहे. या दोघांची वास्तविकता नक्कीच तत्वदर्शी पुरुषांनी पाहिलेली आहे. (2.16) आत्मा (आत्म्यास) ज्याद्वारे हे सर्व विश्व/शरीर व्यापलेले आहे, अविनाशी आहे. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. (2.17) चिरंतन, अपरिवर्तनीय आणि अनाकलनीय आत्म्याचे शरीर नाशवंत
आहे. म्हणून, हे अर्जुना, युद्ध कर. (2.18)
जो या
आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे समजतो ते
दोघेही अज्ञानी आहेत. कारण आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारत नाही
कोणाकडूनही मारला जात नाही. (2.19) आत्मा जन्माला येत नाही आणि तो मरतही नाही. तो अस्तित्वात येत नाही, किंवा त्याचे अस्तित्त्व नष्ट होत नाही. तो अजन्मा, चिरंतन, नित्य आणि पुरातन आहे. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा आत्मा नष्ट
होत नाही. (2.20) हे अर्जुना, आत्मा अविनाशी, चिरंतन, अजन्मा आणि पुरातन आहे हे ज्याला
माहित आहे, तो कोणालाही ठार कसा करेल किंवा मारण्यासाठी कारण कसा बनेल?
(2.21) ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जुन्या
वस्रांचा त्याग करून नवीन वस्र परिधान करतो; त्याचप्रमाणे, जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग
करून नवीन शरीर धारण करतो. (2.22) आत्म्यावर शस्र वार करू शकत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे भिजविता येत नाही आणि वाऱ्याद्वारे सुकविताही येत नाही. आत्मा तुटू शकत नाही, जळू शकत नाही, त्यास भिजविणे किंवा सुकविणे शक्य नाही. तो चिरंतन, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, अचल आणि पुरातन आहे. (2.23-24)
आत्मा अवर्णनीय, अनाकलनीय आणि अपरिवर्तनीय आहे. आत्म्या असा आहे
हे जाणल्यानंतर, तू दु: खी होऊ नकोस. (2.25) जरी तुला असे वाटते की हा जीव किंवा शरीर जन्म
घेते आणि कायमस्वरूपी मृत होते, तरीसुद्धा हे अर्जुना, तू असा शोक करु नये. कारण
जन्मलेल्या प्रत्येकासाठी मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणूनच, तू या अपरिहार्यतेबद्दल
शोक करु नये. (2.26-27) हे
अर्जुना, जन्माच्या आधी आणि
मृत्यूनंतर --- सर्वत्र निर्विकार आहे --- आपल्या डोळ्यांसाठी अव्यक्त आहेत. शरीर केवळ
जन्म आणि मृत्यू दरम्यान प्रकट होते. दु: ख नक्की
कशाबद्दल आहे? (2.28) काहीजण या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, काही लोक त्याचे अद्भुत वर्णन करतात, तर इतर जण आश्चर्य म्हणून ऐकतात. याबद्दल
ऐकल्यानंतरही फारच थोडे लोक त्याला जाणू शकतात. (2.29)
हे अर्जुना, ज्याने संपूर्ण शरीर व्यापले आहे असा आत्मा चिरंतन अविनाशी आहे. म्हणून, तू कोणासाठीही शोक करू नये. (2.30) भगवान श्रीकृष्ण अर्जुनला योद्धा म्हणून असलेल्या त्याच्या कर्तव्याची आठवण करुन देतात क्षत्रिय म्हणून तुझे
कर्तव्य लक्षात घेता तू डगमगून जावू नये. कारण क्षत्रियासाठी, धर्म तत्वाकरिता युध्द
करण्याशिवाय दुसरे चांगले काहीच
नाही. (2.31) हे अर्जुना, केवळ भाग्यवान योद्ध्यांनाच, स्वर्गातील दारे खुली करणारी युद्धाची संधी अनपेक्षितपणे मिळते. (2.32)
जर हे धर्म युद्ध तू लढला
नाहीस, तर तू तुझ्या कर्तव्यांमध्ये अपयशी ठरशील, प्रतिष्ठा गमवशील आणि पापाचा धनी होशील. (2.33)
लोक तुझी नेहमी निंदा करतील. सन्मान्य व्यक्तींसाठी, दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. (2.34)
थोर योद्धे असा विचार करतील की तू भीतीमुळे युद्धातून माघार घेतलीस. जे तुझा अत्यंत आदर करतात, त्यांच्या मनातील तुझ्याविषयीचा आदर नाहीसा
होईल. (2.35) तुझे शत्रू अपमानास्पद शब्दांत तुझा अपमान करतील. यापेक्षा तुला अधिक दु:खदायक काय असू शकते? (2.36) (कर्तव्यपथावर असतांना) मृत्यू झाल्यास तू स्वर्गात जाशील
किंवा विजयी झाल्यास पृथ्वीचे साम्राःज्य उपभोगशील. म्हणून, अर्जुना, युद्ध करण्याच्या दृढनिश्चयाने ऊठ. (2.37) सुख आणि
दु:ख, लाभ आणि हानी, आणि जय आणि पराजय यांना
समान मानून युद्ध कर. अशाप्रकारे आपले कर्तव्य केल्याने
तुला पाप लागणार नाही. (2.38) कर्मयोगाचे महत्व, नि: स्वार्थ सेवा हे अर्जुना, तुला दिव्य ज्ञान प्रदान केले आहे. आता कर्मयोग, निस्वार्थ सेवा यांची महती ऐक, जे सांगितल्यामुळे तू तुझ्या
कर्माच्या बंधनातून मुक्त होशील (कर्म). (2.39) कर्मयोगामध्ये कोणतेही प्रयत्न कधीही निष्फळ ठरत नाही आणि त्यांचा प्रतिकूल
परिणामही होत नाही. या मार्गाचा थोडासा अभ्यास देखील व्यक्तीला जन्म आणि
मृत्यूच्या मोठ्या भयापासून वाचवतो. (2.40) कर्मयोगी व्यक्तीची बुद्धी ईश्वरी-प्राप्तीसाठी दृढ असते, हे अर्जुना, परंतु जे कर्माच्या फळाची उपभोग
घेण्याची इच्छा करतात, त्यांच्या इच्छा अंतहीन असतात आणि त्यांच्या
बुद्धीला अनेक फाटे फुटलेले आहेत. (2.41) वेद जीवनातील भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाबींचा अभ्यास करतात ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, ते वेदांचा खरा अर्थ समजून न घेता, त्यातील
आलंकारिक शब्दांमध्ये आनंद मानतात --- हे अर्जुना, विचार कर, जणू काही वेदांमध्ये स्वर्गीय आनंद प्राप्त करण्याच्या विधींखेरीज अन्य काहीही नाही. (2.42) ते भौतिक वासनेच्या आहारी जातात आणि स्वर्ग
प्राप्ती हे जीवनाचे सर्वोच्च ध्येय मानतात. ते भोग आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी विशिष्ट विधी करतात. त्यांच्या
कर्माचा पुनर्जन्म हाच परिणाम आहे. (2.43) जे लोक आनंद आणि सामर्थ्याशी संलग्न होतात आणि
ज्यांचा न्याय अशा विधीवादी क्रियाकलापांमुळे अस्पष्ट होतो अशा लोकांच्या मनात
आत्म-प्राप्तीचा दृढ निश्चय तयार होत नाही. (2.44) वेदांचा एक भाग भौतिक स्वरुपाच्या तीन रीती
किंवा दशा (गुण) यांच्याशी संबंधित आहे. हे अर्जुन, सर्व द्वंद्वातून मुक्त हो; लाभ आणि रक्षण करण्याच्या यांच्या
काळजीतून मुक्त होवून नेहमी संतुलित राहा आणि चिंता करू नको. तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो आणि आत्म-परायण हो. (2.45) जेव्हा विशाल तलावाचे पाणी उपलब्ध होते तेव्हा
पाण्याच्या लहानसे जलाशय जितके उपयुक्त असते त्याचप्रमाणे आत्मज्ञान असलेल्या
व्यक्तीसाठी वेदांची तितकीच
गरज उरते. (2.46) तुला
केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे,
परंतु कर्मफलांवर
कोणतेही नियंत्रण किंवा दावा नाही. कर्माचे फल हा
तुझा हेतू असू नये. तू कधीही निष्क्रीय होऊ नयेस. (2.47) हे अर्जुना, तू सर्व
शक्तीनिशी तुझे कर्म कर. तुझ्या मनाची परमेश्वराशी निष्ठा ठेवून, चिंता आणि कर्मफलाबद्दल
स्वार्थी आसक्ती न ठेवता यश आणि अपयश दोन्हीमध्येही शांत राहा. मनाच्या या समत्वभावाला
कर्मयोग म्हणतात. (2.48) स्वार्थाच्या हेतूने केलेले कार्य हे निःस्वार्थ
सेवा किंवा कर्मयोगापेक्षा अत्यंत निंद्य आहे. म्हणून, हे अर्जुना, कर्मयोगी हो. जे लोक केवळ आपल्या कर्माच्या फलांचा आनंद उपभोगण्यासाठी कार्य करतात ते खरे तर कृपण असतात. (कारण फलांवर कोणाचेच नियंत्रण नाही). (2.49) एक कर्मयोगी या जीवनातच चांगल्या आणि वाईट
कर्मापासून मुक्त होतो. म्हणून समत्वरूप कर्मयोगाला
चिकटून राहा. कर्माच्या फलाची आसक्ती
न ठेवता आपल्या सर्वोत्कृष्ट क्षमतेनिशी कार्य
करणे म्हणजे कर्मयोग. (2.50) सर्व कर्मांच्या फलांबद्दलच्या स्वार्थी आसक्तीचा त्याग करून, ज्ञानी कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतात आणि परमानंदी दैवी स्थिती प्राप्त करून घेतात. (2.51) जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकले आहेस आणि शास्त्रांमधून जे सर्व ऐकावयाचे आहे त्याबद्दल उदासीन होशील. (2.52) जेव्हा तुझी विवादास्पद
मते आणि वेदांच्या विधीवादी शिकवणीमुळे गोंधळलेली बुद्धी, परमात्म्यावर लक्ष केंद्रित करण्यावर स्थिर आणि दृढ होईल, तेव्हाच तुला परमात्मामधील दिव्य
भावनेची प्राप्ती होईल. (समाधी) (2.53)
अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, ज्या ज्ञानी व्यक्तीची बुद्धी स्थिर असते, त्याची लक्षणे काय आहेत? स्थिर बुद्धी असणारी व्यक्ती कशी बोलते? अशी व्यक्ती कशी बसते आणि चालते? (2.54) परम भगवान म्हणाले: जेव्हा एखादी व्यक्ती
मनाच्या सर्व इच्छांपासून पूर्णपणे मुक्त होते आणि शुद्ध झालेले मन (ब्रह्मा) आत्म्याच्या
ठिकाणी संतुष्ट होते, तेव्हा हे अर्जुना, त्याला एक स्थितप्रज्ञ व्यक्ती
म्हणतात. (2.55) ज्या व्यक्तीचे मन दु: खाने क्षुब्ध झालेले नसते, ज्याला सुखांची
इच्छा नसते आणि जो आसक्ती,
भीती व
क्रोधापासून पूर्णपणे मुक्त असतो त्यांना स्थिर बुद्धीचे,
स्थितप्रज्ञ मुनी म्हणतात. (2.56) जे कशाशीही निगडीत नसतात, जे इच्छित परिणाम मिळवण्यामुळे हर्षोल्हासित होत नाही किंवा
अवांछित परिणामांनी ज्यांना दु:ख होत नाही, त्यांची बुद्धी स्थिर मानली जाते. (2.57)
ज्याप्रमाणे एखादे कासव संरक्षणासाठी कवचामध्ये आपल्या
अवयव ओढून धरते त्याचप्रमाणे जी व्यक्ती जेव्हा सर्व इंद्रिय विषयांपासून आपली इंद्रिये आवरून घेते, तेव्हा अशा व्यक्तीची बुद्धी स्थिर मानली जाते. (2.58) जरी एखादी व्यक्ती इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाली तरी इंद्रिय
विषयांबद्दलची गोडी राहतेच. परमात्म्याच्या
साक्षात्काराने या इच्छा नाहीशा होतात. (2.59) हे
अर्जुना, परिपूर्णतेसाठी
प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या विवेकी पुरुषाचे मन
सुद्धा त्याला जबरदस्तीने ओढून नेतात. (2.60) इंद्रियांना
नियंत्रणात आणल्यानंतर एखाद्याने प्रेमळ चिंतनाने त्याचे मन माझ्यामध्ये
दृढपणे स्थिर करावे. ज्याचे इंद्रियांवर
संपूर्ण नियंत्रण असते त्याचीच बुद्धी स्थिर होते. (2.61) इंद्रिय
वस्तूंबद्दल चिंतन करणाऱ्या व्यक्तीची
इंद्रिय वस्तूंशी आसक्ती वाढत जाते. इंद्रिय वस्तूंची
इच्छा ही इंद्रिय वस्तूंच्या आसक्तीतून येते आणि इच्छापूर्ती न
झाल्यास क्रोध निर्माण होतो. (2.62) क्रोधामधून गैरसमज किंवा अविचार निर्माण होतात. गैरसमजातून मन भ्रमित होतो. मन भ्रमित झाले की तर्क नष्ट होतो. जेव्हा तर्क नष्ट होतो
तेव्हा व्यक्ती योग्य मार्गापासून खाली येते, व्यक्तीचे अध: पात होते. (2.63) इंद्रिय नियंत्रण आणि आत्म-ज्ञानाद्वारे शांती आणि आनंदाची प्राप्ती एक स्थितप्रज्ञ व्यक्ती, इंद्रियांना नियंत्रित ठेवण्यामध्ये समर्थ आणि आसक्ती-अनासक्ती
यांपासून मुक्त असणारी व्यक्ती, इंद्रिय
वस्तूंचा आनंद घेतो आणि प्रसन्नता प्राप्त करते. (2.64) शांतता-प्राप्तीनंतर
सर्व दुःख नष्ट होतात. अशा शांत व्यक्तीची बुद्धी लवकरच पूर्णपणे स्थिर होते आणि परमात्म्याशी एकरूप होते. (2.65) जे लोक शाश्वत परमात्म्यात लीन होत नाहीत
त्यांना आत्मज्ञान किंवा आत्मजान नसते. आत्म-ज्ञानाशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय सुख मिळू शकत नाही.
(2.66) एखादे वादळ ज्याप्रमाणे
समुद्रातील एखादी
नौका आपल्या गंतव्यस्थानापासून जसे दूर घेवून जाते त्याचप्रमाणे – भटकणाऱ्या
कोणत्याही एका इंद्रियावर मन केंदित झाले तर ते
इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. (2.67) म्हणून, हे अर्जुना, इंद्रियविषयांपासून पूर्णपणे इंद्रिये जेव्हा आवरून घेतली जातात, तेव्हाच व्यक्तीची बुद्धी स्थिर
होते. (2.68) जेव्हा इतर सर्वांसाठी रात्री असतो तेव्हा
आत्मसंयमी असणारा योगी जागृत असतो. सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती योगींसाठी रात्र असते. (2.69) (बहुतेक लोक झोपेच्या अधीन असतात आणि रात्री झोपेमध्ये स्वप्नांतील जगात योजना आखत असतात, योगी जगात राहून जगापासून अलिप्त राहतो.) ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रामध्ये नदीचे पाणी त्याला विचलीत
न करता सामावून जाते, त्याचप्रमाणे जो मनुष्य अनेक इच्छा मनात येवूनही विचलीत होत
नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. ज्याला भौतिक वस्तूंची इच्छा असते तो
कधीही शांत नसतो. (2.70) जो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि उत्कटतेपासून तसेच “मी” आणि
“माझे” या भावनेपासून मुक्त होतो तोच शांती प्राप्त करतो. (2.71) हे अर्जुना, ही मनाची अचेतन (ब्राह्मी) अवस्था आहे. या अवस्थेत प्रवेश केल्यामुळे, व्यक्ती भ्रमित होत नाही. मृत्यूच्या अंत: काळी जर एखादा या अवस्थेत स्थिर असेल तर त्या व्यक्तीला ब्रह्मनिर्वाण (भगवद धामास) मिळते. (2.72) 3. कर्मयोगाचा मार्ग अर्जुन म्हणाला: जर तुम्हाला असे वाटते की
कर्मापेक्षा अलौकिक ज्ञान घेणे श्रेष्ठ आहे तर हे कृष्णा, मग तुम्ही मला या भयानक युद्धामध्ये गुंतण्याचा
आग्रह का करीत आहात? तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे.
कृपया निश्चितपणे मला सांगा की यापैकी कोणत्या गोष्टीमुळे मला भगवंताची प्राप्ती
होईल. (3.01-02) परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, मी यापूर्वीच
सांगितले आहे की या जगात,
आध्यात्मिक
साक्षात्कारासाठी दोन मार्ग अस्तित्वात आहे -
चिंतकांसाठी आत्म-ज्ञान (ज्ञानयोग) आणि सक्रियांसाठी निस्वार्थ कर्माचा मार्ग
(सेवा, कर्मयोग). (3.03) केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त
होत नाही. कर्माचा फक्त
त्याग केल्याने कोणीही
परिपूर्णता प्राप्त करत नाही. (3.04) कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही, म्हणूनच प्रत्येकजण निसर्गाच्या शक्तींद्वारे
--- असहाय्यपणे - कृती करण्यास प्रवृत्त आहे. (3.05) भ्रमित लोक, जे कर्मेंद्रिय संयमित करतात परंतु मनाने इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असतात, त्यांना मिथ्याचारी म्हटले जाते. (3.06) एखाद्याने इतरांची सेवा का करावी? जो
प्रशिक्षित व शुध्द मन आणि बुद्धीने इंद्रियांना संयमित करतो आणि नि: स्वार्थ
सेवेसाठी इंद्रियांद्वारे कर्म गुंतवून ठेवतो, हे अर्जुना, असा
व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. (3.07) तू तुझे नियत कर्म कर, कारण खरोखर निष्क्रिय बसण्यापेक्षा नियत कर्म
करणे अधिक श्रेष्ठ आहे. कर्म केल्याशिवाय तुझ्या शरीराचाही
निर्वाह होवू शकत नाही. (3.08) जे नि:
स्वार्थ सेवा म्हणून केले जावू शकत नाही अशा कर्माद्वारे मनुष्य बांधलेले
असतात. म्हणून, हे
अर्जुना, कर्माच्या फलांशी
स्वार्थीपणे आसक्त होण्यापासून मुक्त होण्याकरिता, माझी सेवा म्हणून
तुझे कर्तव्य पूर्ण कार्यक्षमतेने कर. (3.09) एकमेकांना मदत करणे ही निर्मात्याची पहिली आज्ञा आहे ब्रह्मा, निर्मात्याने, सुरुवातीला निस्वार्थ सेवा (सेवा, यज्ञ, त्याग) सह मनुष्यांना निर्माण केले आणि म्हणाले:
यज्ञाच्याद्वारे तुम्ही तुमचा उत्कर्ष करून घ्या, आणि हा यज्ञ तुमच्या इच्छित मनोरथ पूर्ण करेल. (3.10) नि: स्वार्थ सेवेने स्वर्गीय देवतांना संतुष्ट
करा आणि त्या तुमचेही पोषण करतील. अशा प्रकारे एकमेकांचे पोषण केल्याने सर्वांचे परमकल्याण होईल. (3.11) नि: स्वार्थ सेवेद्वारे प्रसन्न झालेल्या देवता तुम्हाला
इच्छित भोग प्रदान करतील. पण अशा भोगाच्या बदल्यात पुन्हा देवतांना काहीही अर्पण न करता केवळ उपभोग घेणारा व्यक्ती
निश्चितपणे चोरच आहे. (3.12) जे सदाचरणी लोक निस्वार्थी सेवेने अर्पण केलेले अन्न ग्रहण
करतात, ते सर्व
पापांपासून मुक्त होतात, परंतु जे अनाचारी लोक केवळ स्वत:साठीच अन्न शिजवतात (प्रथम
मला अर्पण न करता किंवा इतरांसह सामायिक न करता), ते केवळ पापच भक्षण करतात. (3.13)
सर्व सजीव अन्नधान्यातून उत्पन्न होतात; धान्य पावसाद्वारे उत्पन्न होते; नि: स्वार्थ सेवा म्हणून कर्तव्य बजावल्यास पाऊस (देवांचा आशीर्वाद म्हणून)
येतो. (4.32 देखील पाहा).
वेदांमध्ये कर्तव्य निश्चित केले आहे. वेद ब्रह्मा (अनंतकाळचे) पासून आले आहेत.
अशा प्रकारे सर्वव्यापी ब्रह्मा सेवेमध्ये सदैव उपस्थित असतात. (3.14-15)
जी व्यक्ती यज्ञा संबधी कार्य (सेवा) करून सृष्टीचे चक्र चालू ठेवण्यास मदत
करीत नाही आणि जो केवळ आनंददायक सुखाचा
उपभोग घेतो, तो पापी
मनुष्य व्यर्थ जीवन जगतो,
हे
अर्जुना. (3.16) आत्म-अनुभवी व्यक्तीसाठी, जो पूर्णपणे संतुष्ट होवून आत्म्यामध्येच रममाण आहे त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही. (3.17) अशा व्यक्तीला जे काही केले जाते किंवा जे केले
जात नाही त्यामध्ये काहीच रस नसतो. स्वत: ची जाण असलेली व्यक्ती कशासाठीही (देव वगळता) इतर प्राणिमात्रांवर अवलंबून नसते.
(3.18) म्हणूनच, आपले कर्तव्य
नेहमीच कार्यक्षमतेने आणि कर्मफलाप्रति कोणत्याही आसक्तीशिवाय कर, कारण आसक्तीशिवाय
कर्म केल्याने परमेश्वर प्राप्ती होते. (3.19) राजा जनक आणि इतरांनी केवळ नि:
स्वार्थ सेवा (कर्मयोग) करून परिपूर्णता (किंवा आत्म-साक्षात्कार) प्राप्त केला
होता. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि समाजाच्या वैश्विक कल्याणासाठी तू देखील
तुझे कर्तव्य बजावले पाहिजे. (3.20) श्रेष्ठ व्यक्ती जे काही करतात त्याचे सामान्यजन
अनुसरण करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे आदर्श घालून देते त्यानुसार हे
सारे जग कार्य करते. (3.21) हे अर्जुना, तीनही लोकांमध्ये (स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म
नाही आणि मला मिळविण्यास अशक्य असेही काहीही नाही, तरीसुद्धा मी
नियत कर्माचे आचरण करतो. (3.22) हे अर्जुना जर मी अविरतपणे कर्म केले नाही तर सर्व लोक
निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. जर मी कर्म केले नाही तर हे जग नष्ट होईल
आणि मी या सर्व लोकांच्या गोंधळ आणि विनाशाचे कारण ठरेल. (3.23-24)
ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले
कर्म करतात त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने
अनासक्त होवून कर्म करावे. (3.25) नियत कर्माच्या
फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांची मने विचलीत होवू नये, म्हणून विद्वान
व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यासाठी प्रेरित करू नये. याउलट स्वार्थी
आसक्तीशिवाय, भक्तीभावाने सर्व कार्ये कार्यक्षमतेने करुन
इतरांना प्रेरित केले पाहिजे. (3.29
देखील
पाहा.) (3.26) सर्व कर्मे ही निसर्गाची कर्मे आहेत सर्व
कार्ये निसर्गाची उर्जा आणि सामर्थ्याने केली जाते, परंतु अज्ञानाच्या
भ्रमामुळे लोक स्वतःला कर्माचा कर्ता मानतात. (5.09, 13.29 आणि 14.19 देखील पहा) (3.27) अर्जुना, निसर्गातील शक्ती आणि कार्य यांच्याबद्दल ज्याला
ज्ञान आहे, तो कर्माप्रति आसक्त होत नाही, कारण त्याला चांगले ठाऊक असते की निसर्गातील
शक्ती --- आपल्या इंद्रियांच्या आधारे कार्य करीत आहे. (3.28)
निसर्गाच्या मायावी शक्तीने (माया) अज्ञानी लोक
निसर्गाच्या शक्तीने केलेल्या कार्यामध्ये पूर्णपणे मग्न होतात, आसक्त होतात. ज्यांचे ज्ञान अपूर्ण आहे अशा
अज्ञानी लोकांना ज्ञानी जणांनी विचलीत करू नये. (3.26 देखील पाहा.) (3.29) तुझे
कर्तव्य कर ---- मनाच्या आध्यात्मिक चौकटीत, इच्छा, आसक्ती आणि मानसिक दु: खापासून मुक्त
होवून--सर्व कर्म मला समर्पित कर. (3.30) जे कोणी माझ्या या शिकवणीनुसार आपले कर्म करतात -
(विश्वासाने (किंवा संपूर्ण लक्ष देऊन आणि प्रामाणिकपणे) आणि द्वेषरहित होवून - ते सकाम कर्माच्या
बंधनातून मुक्त होतात. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि
त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धि प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते
भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. (3.31-32) सर्व प्राणी त्यांच्या स्वभावाचे अनुसरण करतात.
ज्ञानी मनुष्यसुद्धा त्यांच्या प्रकृतीनुसार वागतात. तर मग बळेच निग्रह केल्याने
काय साधणार आहे? (3.33) आत्मसाक्षात्काराच्या मार्गातील दोन मोठे अडथळे इंद्रियांमध्ये
इंद्रिय
वस्तूंप्रति आसक्ती आणि विरक्ती असते. एखाद्याने या
दोघांच्याही नियंत्रणाखाली येऊ नये कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गातील ते
दोन मोठे अडथळे आहेत.(3.34) एखाद्याची निकृष्ट दर्जाची नैसर्गिक धर्म वरिष्ठ अनैसर्गिक धर्मापेक्षा श्रेष्ठ असतात. एखाद्याला नैसर्गिक धर्माचरण करत
असतांना आलेला मृत्यू उपयुक्त
ठरतो. अनैसर्गिक कर्मामुळे खूप ताण येतो. (18.47
देखील पाहा) (3.35) अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, एखादी व्यक्ती अनिच्छेने आणि इच्छेविरूद्ध जबरदस्तीने पापकर्मे करण्यास कशामुळे उद्युक्त होते? (3.36) सर्वोच्च परमेश्वर
म्हणाले: ते कारण म्हणजे काम
आहे (किंवा भौतिक आणि लैंगिक सुखांची तीव्र इच्छा), जे
उत्कटतेतून जन्म घेते आणि अपूर्ण
राहिल्यावर क्रोधात
रूपांतरित येतो. काम हा अतृप्त आहे आणि एक
भयंकर राक्षस आहे. त्याला शत्रू
म्हणून मान. (3.37) ज्याप्रमाणे
धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्ठीला जातो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान
या कामाद्वारे आच्छादिला जातो. (3.38) हे अर्जुना, माणसाच्या नित्य शत्रू असणाऱ्या या अतृप्त
कामाद्वारे ज्ञानी मनुष्याचे आत्मज्ञान आच्छादिले जाते. (3.39) इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या
कामाची निवासस्थाने आहेत. काम ---
इंद्रियांवर, मनावर
आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवून --- आत्म-ज्ञानावर पडदा टाकून एखाद्या जीवात्म्याला मोहित
करतो. (3.40) म्हणून, हे अर्जुना, प्रथम
इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, आत्मज्ञान आणि आत्म-साक्षात्काराचा विनाश करणार्या भौतिक कामाचा वध कर. (3.41) इंद्रिय शरीरापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले
जाते; मन
इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे; बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे; आणि आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. (6.07-08 देखील पाहा) (3.42) अशा
प्रकारे, हे अर्जुना आत्मा
बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे हे जाणून आणि बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवून (जे
आध्यात्मिक शक्तीद्वारे शुद्ध केलेली आहे), काम या
पराक्रमी शत्रूचा विनाश करणे आवश्यक आहे. (3.43) 4. ज्ञानासह सर्वसंग परित्यागाचा मार्ग कर्मयोग हा एक प्राचीन नियम आहे परम भगवान म्हणाले: मी हा कर्मयोग, योग्य कृतीचे शाश्वत विज्ञान, राजा विवस्वानला दिले. विवास्वानने ते मनुला शिकवले. मनुने ते इक्ष्वाकूला शिकवले. अशा प्रकारे सदाचरणी राजांना हा (कर्मयोग) माहित होता. काळाच्या ओघामध्ये या पृथ्वीवरून कर्मयोगाचे विज्ञान हरवले. आज मी
तुला त्याच प्राचीन विज्ञानाचे वर्णन केले आहे कारण तू माझा प्रामाणिक भक्त आणि सखा आहेस. कर्मयोग हे खरोखर एक दिव्य रहस्य आहे. (4.01-03) अर्जुन म्हणाला: विवास्वान हा जन्माने
तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. म्हणून सृष्टीच्या प्रारंभी तुम्ही हा कर्मयोग त्याला शिकवला, हे मी कसे जाणावे? (4.04) सर्वोच्च परमेश्वर म्हणाले: माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होवून गेले आहेत. मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. (4.05) जरी मी अविनाशी, अपरिवर्तनीय आणि सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरीसुद्धा मी माझ्या दैवी शक्ती (योग माया) चा वापर करून
स्वतःच्या भौतिक स्वरूपावर नियंत्रण ठेवून प्रगट होत असतो. (10.14 देखील पाहा.) (4.06) हे अर्जुना
जेव्हा जेव्हा आणि जिथे धर्माचा (धर्माचरण) ऱ्हास
होतो आणि अधर्माचे (अनाचरनाचे) वर्चस्व होते त्यावेळी मी
स्वतः प्रगट होतो. चांगल्या गोष्टीचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचे
परिवर्तन करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना
करण्यासाठी मी वेळोवेळी प्रगट होतो. (4.07-08) हे अर्जुना, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप (जन्म, देखभाल आणि विनाश) खरोखर जाणतो, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो आणि हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. (4.09) आजपर्यंत आसक्ती, भय, क्रोध
यांच्यापासून मुक्त होवून आणि माझा आश्रय घेऊन, माझे विचार पूर्णपणे आत्मसात
करून आणि आत्म-ज्ञानाच्या अग्नीने अनेकाणेक मनुष्य पवित्र झाले आहेत. (4.10) लोक ज्या हेतूने माझी उपासना करतात, त्यानुसार मी त्यांच्या इच्छांची पूर्ती करतो. लोक वेगवेगळ्या हेतूंनी माझी उपासना
करतात. (4.11) जे लोक पृथ्वीवर आपल्या कामात यशस्वी होण्याची
आस धरतात ते देवतांची उपासना करतात. या मानवी जगात कामातील यश लवकर मिळते. (4.12) मानवी समाजाचे - कौशल्य आणि
व्यवसाय- यावर आधारित चार विभाग माझ्याचद्वारे
तयार केले गेले आहते. जरी मी या श्रम
विभागणीच्या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी एखाद्याला हे माहित असले
पाहिजे की मी अविनाशी असल्यामुळे मी अकर्ता आहे. (18.41 देखील पाहा) (4.13) कार्य किंवा कर्माने मी बद्ध होत
नाही, कारण मला कर्माच्या फलांची इच्छा नाही. ज्याला या सत्याची पूर्ण जाणीव आहे
तो सुद्धा कर्म फलांनी बद्ध होत नाही. (4.14) प्राचीन काळातील मुक्तिच्या
साधकांनीही या दिव्य ज्ञानाने आपली कर्मे केली आहेत. म्हणून, तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. (4.15) संलग्न, अलिप्त आणि निषिद्ध कर्म कर्म म्हणजे काय आणि अकर्म काय आहे, याबद्दल बुद्धिमान लोकही संभ्रमित आहेत.
म्हणूनच, कर्म म्हणजे काय हे मी स्पष्टपणे सांगतो, ते कळले की तू जन्म आणि मृत्यूच्या दुष्परिणामांपासून मुक्त होशील. (4.16) कर्माचे खरे स्वरुप समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच, मनुष्याला कर्माचे (किंवा स्वार्थी) स्वरूप, अकर्माचे (किंवा निःस्वार्थी) स्वरूप आणि विकर्माचे स्वरूप देखील माहित असले पाहिजे. (4.17) कर्मयोगी कर्माच्या नियमांच्या अधीन नाही जो
कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो एक बुद्धिमान
मनुष्य आहे. असा प्रत्येक मनुष्य योगी आहे आणि
त्याने सर्व काही मिळविले आहे. (3.05, 3.27,
5.08 आणि 13.29 देखील पाहा) (4.18) (कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि त्याउलट म्हणजे हे समजून घेणे आहे परमेश्वर आपल्या माध्यमाद्वारे सर्व कर्मे त्याच्या शक्तीद्वारे करतात. तो एक निष्क्रिय अभिनेता आहे. आपण सक्रियपणे
निष्क्रिय आहेत कारण आपण त्याच्या सामर्थ्याच्या प्रवाहाशिवाय काहीही करू शकत
नाही. म्हणूनच आपण कर्ता नाही, फक्त त्याच्या हातातील साधन आहोत.) अशी व्यक्ती, की ज्याच्या इच्छा आत्म ज्ञानरूप आगीमध्ये जळून भाजल्यामुळे निस्वार्थ झाल्या आहेत आहेत, त्याला बुद्धिमान व्यक्ती पंडित म्हणतात. (4.19) आपल्या
कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करणारा आणि नित्य तृप्त असणारा आणि परमेश्वर
सोडून इतर कोणावरही अवलंबून नसणारा, जरी सर्व प्रकारच्या --- कर्मामध्ये
मग्न असला तरी --- वास्तविक तो काहीही करत नाही
आणि चांगली किंवा वाईट अशी कोणतीही कार्मिक प्रतिक्रिया
निर्माण करत नाही. (4.20) जो सर्व
इच्छांपासून मुक्त झाला आहे, ज्याचे मन आणि इंद्रिय त्याच्या नियंत्रणात आहेत, आणि
जो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्त्वाच्या भावनेचा त्याग करतो, तो
शारिरीक क्रिया करूनही -- कार्मिक प्रतिक्रियेच्या – पापकर्माने प्रभावित होत
नाही. (4.21) त्याच्या/परमेश्वराच्या इच्छेनुसार नैसर्गिकरित्या जे काही मिळते त्या लाभाने जो संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे, मत्सर करीत नाही, यशापयशामध्ये स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची
कर्म करीत असला तरी असा कर्मयोगी कर्मामुळे कधीच बद्ध होत नाही. (4.22) जो
आसक्तीपासून मुक्त आहे, ज्याचे मन पूर्णपणे आत्मज्ञानामध्ये स्थित आहे, जो भगवंताची सेवा (सेवा) म्हणून कर्म करतो, अशा परोपकारी व्यक्तीची (कर्मयोगी) सर्व कर्मबंधने मुक्त होतात. (4.23) जो सर्व काही भगवंताचे
प्रकटीकरण किंवा
ब्रह्मदेवाचे कृत्य मानतो त्याला शाश्वत ब्रह्मा प्राप्त
होईल. (9.16 देखील पहा) (4.24) वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्मिक पद्धती काही योगी देवदेवतांना (देव, संरक्षक देवदूत) यज्ञाद्वारे अनुष्ठान
करून त्यांची उपासना करतात, तर काही आत्म-ज्ञानासाठी शास्त्रांचा अभ्यास
करतात. काही त्यांच्या इंद्रियांवर अंकुश ठेवतात आणि त्यांच्या कामसुखाचा त्याग करतात. इतर प्राणायाम व योगाभ्यास करतात. काहीजन दान देतात आणि आपल्या संपत्तीचा त्याग करतात. (4.25-28) जे लोक
योगाभ्यासात गुंतलेले आहेत, ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची
प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून समाधी अवस्थेत
राहतात. (4.29) अन्य लोक त्यांचा आहार नियमन करतात आणि प्राणवायूच
प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. हे सर्व लोक त्यागाचे जाणकार आहेत आणि त्यांच्या बलिदानाद्वारे शुद्ध झालेले आहेत. (4.30) नि: स्वार्थ सेवा करणार्यांना त्यागाचा परिणाम म्हणून आत्म-ज्ञानाचा
सुगंध प्राप्त होतो आणि परमात्म्याला
प्राप्त होतात. हे अर्जुना, त्याग न करणारे या
जगातसुद्धा सुखाची प्राप्ती करू शकत नाही, तर परलोकाबद्दल काय
सांगावे? (4.38 आणि 5.06 देखील पाहा). (4.31) वेदांमध्ये अनेक प्रकारच्या आध्यात्मिक
शास्त्राचे वर्णन केले आहे. ते सर्व कर्मातून किंवा
शरीर, मन आणि इंद्रियांच्या कृतीतून जन्मलेले आहेत हे जाणून घे. हे जाणून घेतले तर तुझे तारण होईल (मोक्ष, निर्वाण). (3.14 देखील पाहा)
(4.32) अलौकिक ज्ञान मिळवणे ही एक श्रेष्ठ आध्यात्मिक पद्धत आहे हे
अर्जुना, कोणत्याही (द्रव्यमय
यज्ञापेक्षा)/ (भौतिक लाभापेक्षा किंवा
भेटवस्तूपेक्षा) आत्म-ज्ञान संपादन करणे आणि त्याचा प्रसार
श्रेष्ठ आहे. कारण सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान शेवटी दिव्य
ज्ञानामध्ये होते. (4.33) आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीकडून नम्र श्रद्धेने, प्रामाणिकपणाने प्रश्न विचारून आणि सेवेद्वारे
हे दिव्य ज्ञान मिळव. ज्या ज्ञानी लोकांना
सत्याची जाणीव झाली आहे ते तुला ज्ञान प्रदान करतील. (4.34) हे अर्जुना, हे सत्य समजल्यानंतर, तू पुन्हा अशा
प्रकारे मोहित होणार नाहीस. या ज्ञानाने तू सर्व प्राणीमात्र हे
माझ्यामध्येच (सर्वप्रथम)
परमात्म्यामध्ये पाहशील, नंतर तुझ्या स्वत:च्याच उच्च स्वरूपामध्ये पाहशील (आणि मग प्रत्येक गोष्टीत मलाच पाहशील). (4.35) जरी कोणी सर्व पापी
लोकांपैकी महापापी असेल, तरीही केवळ
एकट्या आत्म-ज्ञानाच्या नौकेने पापाचे महासागर ओलांडू शकेल. (4.36) ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकूड भस्मसात
करून टाकतो त्याचप्रमाणे, हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून
टाकतो.(4.37) कर्मयोगींवर अलौकिक ज्ञान स्वयंचलितपणे प्रकट होते खरे तर, या जगामध्ये परमात्म्याच्या खऱ्या ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे काहीही नाही. जो कर्मयोगाने शुद्ध होतो त्याला हे ज्ञान काळाच्या ओघात
नैसर्गिकरित्या स्वत:मध्येच प्राप्त होते. (4.31 आणि 5.06, 18.78 देखील पाहा) (4.38) जो मनुष्य
श्रद्धावान आणि
योगशास्त्रामध्ये प्रामाणिक आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत, त्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान प्राप्त केल्यावर, त्याला परम शांती प्राप्त होते. (4.39.) अविवेकी, संशयी आणि श्रद्धाहीन
मनुष्य (नास्तिक) नष्ट होतो. अशा संशयी आत्म्याला हे लोक ना परलोक किंवा सुखाचीही प्राप्ती होवू शकत
नाही. (4.40) निर्वाणासाठी अलौकिक ज्ञान आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत कर्मफलांचा त्याग करून जो कर्म करतो आणि आत्म-ज्ञानाद्वारे ज्याचे स्वत:बद्दलचे संशय पूर्णपणे नष्ट झाले आहेत, हे अर्जुना तो कार्य(कर्म) बंधानांनी बद्ध होत नाही (4.41) म्हणून, अज्ञानामुळे तुझ्या मनात (परमात्म्याबद्दल) जे संशय उत्पन्न झाले आहेत ते आत्म-ज्ञानाच्या तलवारीने छाटून टाक आणि कर्मयोगाचा
आश्रय घे आणि हे अर्जुना, युद्धासाठी उभा राहा.(4.42) 5. संन्यासाचा मार्ग अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, आपण अलौकिक ज्ञानाची आणि निस्वार्थ सेवेच्या कर्मयोगाची प्रशंसा केलीत. मला सांगा, या दोघांपैकी माझ्यासाठी कोणता अधिक कल्याणकारक आहे, ते कृपया मला
सांगा. (5.05 देखील पाहा) (5.01) परम भगवान म्हणाले: आत्म-ज्ञानाचा मार्ग आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग दोघेही सर्वोच्च ध्येयाकडे नेतात. परंतु, या दोघांपैकी निःस्वार्थ सेवा ही
आत्म-ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. (5.02) ज्याला आसक्ती नाही आणि अनासक्तीही नाही अशा व्यक्तीला खरा संन्यासी समजला पाहिजे. हे अर्जुना, सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे कर्म बंधनातून मुक्त होतो. (5.03) दोन्ही पथ परमात्म्याकडे पोहोचतात अज्ञानी लोक --- विद्वान नव्हे --- आत्म-ज्ञानाचा मार्ग (किंवा संन्यासाचा) आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग (कर्मयोग) एकमेकांपेक्षा वेगळा आहे असे समजतात. जो कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रितीने अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. (5.04) संन्यासी जे काही ध्येय गाठतो, कर्मयोगीदेखील तेच ध्येय गाठतो. म्हणून, जो संन्यासाचा मार्ग आणि निःस्वार्थ कर्माचा मार्ग एक सारखाच पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. (6.01 आणि 6.02 देखील पाहा) (5.05) परंतु, हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय खरा
संन्यास प्राप्त करणे अवघड आहे. कर्मयोज्ञाला विनाविलंब
ब्रह्माची प्राप्ती होते. (4.31 आणि 4.38 देखील पाहा) (5.06) एक कर्मयोगी ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याचे मन आणि इंद्रिय नियंत्रित आहेत आणि जो सर्व जीवात्म्यामध्ये परमात्म्याला पाहतो, तो
कर्म करत असूनही कर्म बंधनात बद्ध होत नाही. (5.07) एक कर्मयोगी भगवंतासाठी कार्य करतो सत्य जाणणारा विद्वान मनुष्य(किंवा संन्यासी) विचार करतो की: "मी काहीही करत नाही". पाहत असतांना, ऐकत असतांना, स्पर्श करीत असतांना, वास घेत असतांना, खात असतांना, चालत असतांना, झोपत असतांना, श्वास घेतांना; आणि बोलतांना, दान करतांना, स्वीकार करतांना तसेच डोळ्यांची
उघडझाप करतांना एक संन्यासी नेहमी जाणतो की केवळ इंद्रिये
आपापल्या विषयांवर कार्य करत आहेत. (3.27.13.29 आणि 14.19 देखील पाहा.) (5.08-09) जो सर्व कर्मे भगवंताला
समर्पित करून --- स्वार्थी आसक्ती न ठेवता आपले कर्म
करतो – तो ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्याने ओले
होत नाही त्याप्रमाणे कार्मिक प्रतिक्रियेपासून प्रभावित होत नाही. (5.10) कर्मयोगी --- स्वार्थी आसक्तीचा त्याग करून --- शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारे केवळ आत्म शुध्दीकरणासाठी कर्म करतात. (5.11) कर्मयोगी कर्माफलांचा त्याग करून
परम आनंद प्राप्त करतो;
तर इतर, जे कर्म
फलांशी आसक्त आहेत ते स्वार्थाच्या कर्मांनी बद्ध
होतात. (5.12) एखादी व्यक्ती ज्याने सर्व कर्मांच्या फलाचा पूर्णपणे त्याग केला आहे, तो कर्म न करता आणि कर्म न करविता आनंदाने जगतो. (5.13) परमेश्वर कृती करण्याची उत्कट इच्छा निर्माण
करीत नाही, कर्तृत्वाची भावना किंवा लोकांमध्ये कर्मफलाबद्दल आसक्ती निर्माण करत नाही. हे सर्व प्रकृतीच्या शक्तींद्वारे केले जाते. (5.14) एखाद्याच्या पुण्य किंवा पाप कर्माची जबाबदारी परमेश्वर स्वत:कडे घेत नाही. आत्मज्ञान हे अज्ञानाने आच्छादित केले जाते; त्याद्वारे लोक मोहित होतात (आणि पाप कर्मे करतात). (5.15) अलौकिक ज्ञान आत्म्याच्या अज्ञानाचा नाश करते आणि ज्याप्रमाणे सूर्य जगातील सर्व वस्तूंचे सौंदर्य
प्रकाशित करतो त्याप्रमाणे हे ज्ञान परमात्म्याला प्रकाशित
करते. (5.16) ज्या मनुष्याचे मन आणि बुद्धी
पूर्णपणे ब्रह्मा (चिरंतन अस्तित्व) मध्ये एकरूप होते, जे ब्रह्माचे असीम भक्त
आहेत, ज्यांचे सर्वोच्च
लक्ष्य आणि एकमात्र आश्रयस्थान ब्रह्मा आहे आणि
ज्यांची कल्मषे ब्रह्माच्या ज्ञानाने धुतली
गेली आहेत आहे,
त्यांना
मुक्ती मिळते, ते पुन्हा जन्म घेत नाहीत. (5.17) |